” या ” गावाचा भुगर्भात दफन आहेत 24 मंदीरे…!

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 35 Second

अनेक दंथकथा प्रचलित ; देखणे शिल्प बेवारस स्थितीत

गोंडपिपरी

कधीकाळी वैभवाचा शिखरावर असलेलं गाव आज भक्कास अन मागासलेलं आहे. गावाचा वैभवाचा खुणाही भुगर्भात दफन झाल्यात. एक नव्हे दोन नव्हे तब्बल चोविस मंदीरावर काळाने माती टाकली.ही मंदीरे भुगर्भात निपचित पडली आहेत.अनेक राजवटीने या गावावर सत्ता गाजविली मात्र हे गाव कुणी बसविलं याचे ठोस पुरावे अद्यापही गवसलेले नाहीत.चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कुडे, नांदगावाचा उदरात अनेक रहस्य दडली आहेत.

इतिहासाचा अनेक रंजक कथा भुगर्भात दफन आहेत.भुगर्भात दडलेल्या काही कथा उत्खननातून बाहेर येतात तर काही योगायोगाने गवसतात. अशीच एक कथा कुडे नांदगाव या लहानश्या गावाची आहे. आज मागासलेलं आणि समस्याचे माहेरघर वाटणार हे गाव कधी काळी भरभराटीस आलेलं मोठं शहर अन बाजारपेठ होतं.त्याचा खाणाखुणा गावभर विखुरल्या आहेत. या गावाचे दूसरे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा भुगर्भात तब्बल 24 मंदीरे दफन आहेत.गावाला लागुनच असलेल्या तलावाचा पाळीवर असलेल्या छोट्याखाणी मंदीर परिसरात अनेक दर्जेदार देखणे शिल्प ठेवल्या गेली आहेत.शेतात नांगरतांना,घरकामात येथे टेराकोटाचा भांड्यांचे शिल्प,खेळण्या सापडतात.बहामणी सल्तनतची तांब्याची नाणी अनेकांना सापडली आहेत.येथे सापडलेल्या शिल्पाचा बनावटीवरून ते चालुक्य,परमार,नाग,गोंड आणि भोसले राजवटीचे असावेत असा अभ्यासकांचा अंदाज आहे.असे असले तरी या गावावर नेमके कुणाचे राज्य होतं हे ठामपणे सांगता येईल असे पुरावे अद्याप गवसले नाहीत.

मार्कंडेश्वर ऋषीची दंतकथा…!

गावात प्रचलित असलेल्या दंतकथेनुसार मार्कंडेश्वर ऋषी गावात तपस्या करण्यासाठी आले होते.त्यांच्यासाठी कुण्या राजाने मंदीर बांधकामास सूरवात केली. मात्र काही आपत्ती आली अन ऋषींनी गाव सोडले.गडचीरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदीरासाठी येथिल शिल्प बैलबंडीने नेण्यात आलीत.ही दंथकथा खरी होती याबाबत मात्र ठोस पुरावे अद्याप सापडले नाहीत.

आता भिवकुंड झाली गावाची ओळख…

कुडे नांदगावापासून अवघ्या तिन कि.मी.अंतरावर भिवकुंड आहे. सभोवताल घनदाट वनराई असलेल्या या स्थळाला भेट देण्यासाठी भाविक दूरवरून येतात.भिवकुंडला जाण्यासाठी कुडे नांदगाव येथून मार्ग आहे.भिवकुंड सध्या कुडे नांदगावाची ओळख ठरत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *