टाळेबंदीत फिरते विक्री केंद्राने तारले

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 6 Second

 

जिल्ह्यातील शेकडो महीलांना रोजगार

चंद्रपूर

टाळेबंदीत सर्व सामान्यांचे आर्थिक बजेट कोळमळले. रोजगार नसल्याने अनेकांसमोर उद्रनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उद्दभवला होता.अश्यात माविमचा फिरत्या विक्रीने केंद्राने रिकाम्या हातांना रोजगार दिला. या केंद्रातून 360 महीलांना टाळेबंदीचा बिकट स्थितीत उदर्निवाहनाचे साधन उपलब्ध झाले आहे.

मानव विकास कार्यक्रम सन २०१८-१९ अंतर्गत माविम चंद्रपूर तर्फे फिरते विक्री केंद्र उपक्रम राबविण्यात आले. मुल, नागभीड, जिवती तालुक्यात हा उपक्रम प्रभावीपणे अमलात आनला गेला. या उप्रकमातून तिन तालुक्यातील ६० महिलांना प्रत्यक्षरित्या व २७० महिलांना अप्रत्यक्षरित्या असे एकूण ३६० महिलांना रोजगार मिळाला आहे.
टाळेबंदीत फिरते विक्री केंद्र योजनेलाही ग्रहण लागले होते. वाहतुकीस परवानगी नसल्याने साहित्य पुरवठा ठप्प पडला होता. अश्यात माविमने पुढाकार घेतला. जिल्हाधिकारी यांच्या सहमतीने कार्यक्रमास पुन्हा सुरुवात केली. माविम चंद्रपूर संचालित मैत्रीण सिएमआरसी मुल, सर्वोदय सिएमआरसी गडचांदूर, व दिशा सिएमआरसी तळोधी मार्फत बचत गटातील महिलांना साहित्य पुरवठा केला गेला. माविम चंद्रपूच्या प्रयत्नाने फिरते विक्री केंद्र नियोजनानुसार ग्रामीण व तालुका स्तरावर विक्री सुरु झाली आहे. फिरते विक्री केंद्रामार्फत टाळेबंदीत बचत गटातील महिलांद्वारा उत्पादित भाजीपाला,दुग्धजन्य पदार्थ,व अन्य वस्तूंची विक्री केली जात आहे. या फिरते विक्री केंद्राचे सनियंत्रण माविम संचालित लोकसंचालीत साधन केंद्रा मार्फत केल्या जाते.
टाळेबंदीत बाजारपेठ बंद असतांना सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री आणि पुरवठा करण्यास फिरते विक्री केंद्राची मदत होत आहे. ग्राहकांना बाजारपेठेत जाण्याऐवजी थेट त्यांच्या परिसरात, वस्तीत आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सुविधा उपलब्ध होत आहे. सोबतच बचत गटातील महिलांनाही हक्काची बाजारपेठ मिळाली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *