शेतशिवारात मस्त्य पालन ; ग्राहकांची झूंबळ

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 9 Second

गोंडपिपरी

शेती बेभरोश्याची झाली आहे.त्यामुळे बहूतांश शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वढले आहेत. मस्त्य पालनाकडे शेतकर्यांचा ओढा वाढलेला आहे.शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात अनेक शेतकर्यांनी मस्त्य पालन सूरू केले आहे.सकमूर येथिल गजानन काळे यांच्या शेततळ्यातील मासोळीला मोठी मागणी आहे. कोरोनाचा काळात मटन,कोंबडीचे वाढले असतांना कमी दरात ताजी मासोळी मिळत असल्याने शेततळ्यावर खवय्ये गर्दी करीत आहेत.

देशात लॉकडाऊननंतर मटण आणि गावरान कोंबडीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळं आता सर्वसामान्यांनी तुलनेत स्वस्त असलेल्या मासोळीकडे आपला मोर्चा वळवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मासोळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं आणि हॉटेल्स बंद असल्यानं मासोळीचे दर 200 रुपये प्रतिकिलो एवढे आहेत. तर मटण 700 आणि गावरान कोंबडी 600 रुपये किलो आहे. या वाढलेल्या किमतीमुळे मांसाहार करणाऱ्यांची अडचण झाली. त्यामुळं मासोळीचा पर्याय त्यांनी निवडला. ग्रामीण भागात गावतलाव किंवा शेततळ्यात पकडलेल्या मासोळ्या आता जागेवरच विकू लागल्यात. गोंडपिंपरी तालुक्यात सकमुर इथं प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी मागेल त्याला शेततळी या योजनेतून दोन शेततळे घेतले. त्यात मत्स्यपालन सुरू केलं. एप्रिल महिन्यात त्यांनी बीज सोडले आणि आता साधारणपणे एक किलो वजनाची मासोळी तयार झाली. ही मासोळी घेण्यासाठी आता परिसरातील नागरिक थेट त्यांच्या ताळ्यावरच जाऊ लागले. रुपचंद आणि पंगस प्रजातीच्या या मासोळ्या जिल्ह्यात आवडीनं खाल्ल्या जातात. त्यामुळं गजानन पाल यांना घरबसल्या आर्थिक साह्य होत आहे. एरव्ही, बाजारात जाऊन किंवा एखाद्या व्यापाऱ्याला शोधून त्या विकाव्या लागत. पण आता मत्स्यपालकांना त्याची चिंता राहिली नाही. आता श्रावण मास संपल्यानं खवय्ये अशा संधीच्या शोधात असतातच. अशावेळी जर संधीचं सोनं होत असेल, तर कोण नकार देईल. एककडे ग्राहकांना कमी दरात ताजी मासोळी मिळत आहे. या व्यवसायात मिळणारा नफा बघता अनेक शेतकर्यांनी मस्त्यपालन सूरू केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *