काय सांगता…! चंद्रपूरात आहे डायनोसरचे गाव

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 29 Second

 

वरोरा

ज्यूसासिक काळात चंद्रपूर जिल्हाच्या भुभागावर महाकाय डायनोसरचं राज्य होतं.भौगोलिक उलथापालथ झाली अन हे जिव भुगर्भात दफन झालेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावाचा उदरात निपचीत पडलेले डायनोसरचे जिवाश्म प्रकाशात आलीत. आता आपल्या गावाची ओळख ” डायनोसारचे गाव ” व्हावे यासाठी गाव झटत आहे.ग्रामपंचायतेने लेटर पॕडवर डायनोसारचे चित्र छापले आहे. जगाला या गावाची ओळख आहे मात्र जिल्हाला गावाचा विसर पडला आहे.त्या गावाचे नाव आहे पिजदुरा.

करोडो वर्षापुर्वी पृथ्वीतलावर महाकाय डायनोसरचा विविध प्रजातींच राज्य होतं.हे महाकाय जिव पृथ्वीतलावरून कसे नष्ट झाले याचे कुतूहल संशोधक आणि सर्वसामान्यांनाही आहे. ज्यूरासिक पार्क ,ज्यूरासिक व्हर्ड सारख्या सिनेमांनी डायनोसर बाबतची उत्सुकता वाढविली.ज्यूसासिक काळात चंद्रपूर जिल्हाच्या भागावर महाकाय डायनोसरचं राज्य होतं,याचे पुरावे सन 1865 मध्ये ब्रिटिशांना गवसले. डायनोसरचे जिवाश्म सापडणारी भारतातील दुसरी मोठी साईट चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या पिजदुरा येथे आहे. वरोरा तालुक्यात येणारे हे गाव तालुक्यापासून 14 कि.मी.अंतरावर आहे.गावाला लागुनच असलेल्या टेकडावर डायनोसरचे जिवाश्म विखुरले होते.
या टेकडीवर आणि परिसरात शाकाहारी डायनोसरचे जिवाश्म सापडले आहेत.ज्यूरासिक काळात अस्तित्वात असलेल्या आज नष्ट झालेल्या जलचर प्राण्यांचे जिवाश्म येथे आढळून आले आहेत.येथे सापडलेल्या जिवाश्मात कवट्या,कशेरूक,हातापायांची हाडे,चिलखती चखल्या,दात व विष्ठा यांचा समावेश आहे.
पिजदुरा येथे सापडणार्या डायनोसारचा जिवाश्माचा अभ्यास करण्यासाठी परदेशी अभ्यासक,संशोधक गावात यायचे.महीनाभर ते गावात थांबायचे.गावातील मुलांना घेऊन परदेशी अभ्यासक टेकडीवर जिवाश्म गोळा करायचे.टेकडीवर सापडणारा दगड बहूमुल्य असल्याचे गावाने ओळखले.ज्या डायनोसारचा जिवाश्मामुळे आपल्या गावाचे नाव सातासमुद्रापार गेले,तीच आपल्या गावाची ओळख व्हायला हवी ,असे गावकर्यांनी ठरविले. गावाने तसे प्रयत्नही चालविले आहेत. आता तर पिजदुरा ग्रामपंचायतेने लेटर पॕडवर डायनोसरचे चित्र छापले आहे.
गावकर्यांनी दिलेल्या माहीतीनुसार ,टेकडीवर आणि परिसरात डायनोसारचे मोठ्या आकाराचे जिवाश्म सापडत होते. अभ्यासासाठी आलेल्यांनी येथिल जिवाश्म सोबत नेले.आज पुष्ठभागावर जिवाश्म नसल्यातच आहेत.येथिल ग्रामपंचायत कार्यालयात डायनोसारचा मांडीचे जिवाश्म ठेवले आहे.

…तर पिजदुर्यात ज्युरासिक पार्क

पिजदुर्यात ज्या भागात डायनोसारचे जिवाश्म आढळून आले आहेत,त्या भागाचे उत्खनन केल्यास डायनोसारचा विविध प्रजातींचे जिवाश्म आढळण्याची शक्यता आहे. येथे सापडणार्या जिवाश्मांचे सवर्धन करण्यासाठी शाशनाने पिजदुरा गावातच ज्युरासिक पार्कची निर्मिती करावी,अशी गावकर्यांची एकमुखी मागणी आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *