शुद्रक आणि सातवाहन राजा ” स्वाति

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 27 Second

 

शुद्रक राजा ज्या स्वाति नामक राजपुत्राचा संगतीत वाढला तो स्वाती हा राजपुत्र सातवाहन घराण्यातील होता.पुराण्यात आलेल्या उल्लेखानुसार स्वाति हा सातवाहन राजवंशातील 11 वा राजा होता.तो मेघस्वाति नंतर राजा झाला होता. ” अवन्तिसून्दरीकथासारा ” चे संपादक एम.रामकृष्ण कवि यांनी शुद्रक हा सातवाहन नृपती स्वाति याचा समकालीन असावा असा अनुमान काढला आहे.या स्वाति राजाचा मार्कंडा मंदीर परिसरात शिलालेख सापडला आहे. या शिलालेखाचे वाचन जनरल कनिर्घम यांनी केले आहे.त्यांची नोंद त्यांनी करून ठेवली आहे. मृच्छकटिक नाटकात वेणाकट प्रदेशाचा उल्लेख आलेला आहे. दहाव्या अंकात आलेला उल्लेख असा ” राज्यप्राप्तीझाल्यानंतर लागलीच तूम्हचा मित्र आर्यक तूम्हाला वेणातीरावरील कूशावतीचे राज्य अर्पण करीत आहे.ते स्विकारून मित्राची ही विनंती मान्य करावी. ”
वेणातीरावरील प्रदेश याचा अर्थ वैनगंगा नदीकाठचा प्रदेश असा होतो.सातवाहनाचा लेखात वेणा काठचा प्रदेशाचा उल्लेख आला आहे.ही नदी भंडारा,चंद्रपूर जिल्हातून वाहत जाते.शुद्रक राजा ज्या प्रदेशावर राज्य करित होता,त्या प्रदेशात बुध्द धम्माचा प्रसार,प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता.मृच्छकटिक नाटकातील अनेक प्रसंगात बौध्द भिक्षू,उपासक,विहारांचा उल्लेख आढळतो.

शुद्रक आणि चांदागड

शुद्रक हा राजा होता. तलवारीचा जोरावर त्याने जग जिंकले होते.प्रियजनांचा सहवासात त्याने शंभर वर्ष राज्य केले.शुद्र असूनही त्याचे संस्कृत भाषेवर प्रभूत्व होते. शुद्रकाचे दूसरे वैशिष्ट्य असे की,राजा असूनही तो हळवा होता.जनतेचे दूख त्याला बघवत नसे. त्याचा परिने जनता सूखी राहावी यासाठी तो प्रयत्न करीत असावा मात्र मानवी व्यवहारातून उत्पन्न होणाऱ्या दूखाचे काय ? हे दूख ज्याचे त्यालाच दूर करावे लागते. मानवी व्यवहारातून उत्पन्न होणाऱ्या दूखाचे त्याने चिंतन केले.या चिंतनाने समाजाकडे बघण्याची त्याची नजर बदलली. त्याचा मनात चाललेली ही खदखद त्याचा साहीत्यातून उमटली. आपल्या साहीत्यात रामायण,महाभारत वा इतर कुठल्या राजे,रजवाडे वा स्वताची महती त्याने गायली नाही.त्याने आपल्या साहीत्यात समाजातील खालचा स्तरातील म्हणून हीणवल्या गेलेल्या लोकांना स्थान दिले. त्यामुळे संस्कृत भाषेतील मृच्छकटिक हे नाटक विरूध्द प्रवाहातील ठरले आहे.शुद्रक या नावावरूनच त्याचे घराणे शुद्र होते हे दिसते.त्याने बौध्द धम्म स्विकारला होता. नाटकात आलेल्या उल्लेखाचा अभ्यास केला तर त्याचे राज्य विदर्भात होते.भंडारा जिल्ह्यातील पवणी आणि विभाजनपुर्व चांदा जिल्ह्यात तो होवून गेला असावा,असे माझे व्यक्तीगत मत आहे. या शुद्रकाचा इतिहास बाहेर येणे गरजेचे आहे.विदर्भातील इतिहासात शुद्रकाचा इतिहास मोलाची भर घालणारा आहे.

निलेश झाडे

8805375549

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *