अठरा वर्षीय युवक नदीत बुडाला ;अजूनही बेपत्ता ;शोध सूरू

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 26 Second

मूल
मूल येथील व्यवसायी प्रकाश सावरकर यांचा मुलगा शिवम सावरकर (१८ वर्षे) हा उमा नदीच्या कोसंबी घाटावर आज सकाळी मित्रां बरोबर पोहण्यासाठी गेला असता नदीत बुडाल्याची विश्वसनिय माहीती आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोटी द्वारे युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू होते. तो पर्यंत ़शिवमचा मृतदेह सापडला नव्हता.
स्थानिक नव भारत विद्यालयाचे पटांगणावर क्रिकेट खेळुन झाल्यानंतर सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान शिवम सहा मिञांसोबत कोसंबी घाटावर पोहायला गेला होता. पोहतांना निंबाळकर नामक मिञ पाण्यातील खोल खड्ड्यात बुडत असल्याचे लक्षात येताच काही मिञ त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान शिवम सावरकर हा त्यांच्या मदतीला जात असतानाच तो खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाला. निंबाळकर नामक मिञाला पाण्याबाहेर काढण्यात यश आले परंतु शिवम सावरकर याला बाहेर काढता आले नाही. सदर घटनेची माहीती होताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाली. नदी पाञात रेती उत्खनना सोबतच नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत, पाणी सुध्दा भरपुर असुन प्रवाह वेगात आहे. त्यामुळे बोटीसह नावाड्यांना बोलावण्यात आले.
दुपारी साडेतीन वाजता पथकासह बोट उपलब्ध झाली. तो पर्यंत मूल वरून पोहण्यात तरबेज असलेल्या ढिवर बांधव बुडालेल्या शिवमचा शोध घेत होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोटी द्वारे युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू होते. तो पर्यंत ़शिवमचा मृतदेह सापडला नव्हता. घटनास्थळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *