चंद्रपूर जिल्ह्यातील बौध्द लेण्या…!

1 0
Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 15 Second

 

विदर्भातील बुध्द धम्माचा इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करू लागतो तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते.
भद्रावतीत प्रसिद्ध विजासन लेणी आहे.या लेणीचा अभ्यासासाठी आणि लेणी बघण्यासाठी दूरदूरचे बौध्द बांधव येत असतात.मात्र जिल्ह्यात केवळ हीच एक लेणी नाही अनेक लेणी समुह जिल्ह्यात तील विविध भागात बघायला मिळतात. या लेण्यांची प्रसिद्धी झालेली नाही. परिणामी जिल्ह्यातील बौध्द बांधवानांच या लेण्यांची माहीती नाही. चंद्रपूर जिल्ह्यात येणार्या नागभिड तालुक्यातील कुनघाडा येथे पाच लेणीसमुह आहेत.स्थानिक नागरिक यांना पांढव गुफा म्हणतात.या लेणी समुहातील क्रमांक दोनची लेणी महत्वाची आहे.या लेणीस एक स्तंभ असून स्तंभामुळे ही लेणी व्हरांडा व अंर्तकक्ष अश्या दोन भागात विभागली आहे.या समुहातील एका लेणीवर धम्मलिपीतील 13 अक्षरे कोरली आहेत.या शिलालेखाचे वाचन पुरातत्वेवेत्ते र.रा.बोरकर यांनी ” शिव स्वामी पुत्तस ग्रामे पमई ” असे केले आहे. याचा मराठी अनुवाद शिवस्वामीचा मुलगा पमई गावाचा असा होतो. शिवस्वामीचा मुलाने या गुफा समुहा कोरून बौध्द भिक्षूसंघास अर्पण केल्या आहेत.या लेण्यांचा कालखंड इ.स.च्या पहील्या किवा दुसऱ्या शतकातील असाव्यात असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.या लेण्या सातवाहनकाळातील असाव्यात असे अभ्यासकांचे मत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
50 %
Excited
Excited
50 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *