प्राचीन काळातील दिवे

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 4 Second

आज आपण इलेक्ट्रिकचा वापर करून रात्रीच्या काळोखाला उजेडात परावर्तीत केलेले आहे ..
तसेच प्राचीन काळातही मानव गुहेत असतांना शेकोटीचा वापर उब व उजेडासाठी करीत असे ..
त्यानंतरच्या काळात जेंव्हा मानव नदीच्या काठावर शेती करु लागला तेंव्हा त्याने नगरे निर्माण केली ..
व मातीच्या भांड्यांचा वापर करु लागला ..त्या काळात उजेडासाठी तो मातीच्याच दिव्यांचा वापर करीत असे ..
मातीचे दिवे सर्वच मानवी संस्कृतीमध्ये बघायला मिळतात ..
सुरेरियन – असेरियन दिवे हे त्यांच्या भुदेवी ईस्तर देवतेच्या शिल्पासह निर्माण झालेले होते ..
तर इजिप्तिशियन दिवा हा त्यांच्या देवतेच्या चेहऱ्यासह बघायला मिळतो ..
आपल्या महाराष्ट्रात सातवाहन कालीन दिवे बघायला मिळतात ..
जुन्नर येथील माझे मित्र बाप्पुजी ताम्हाणे यांचे संग्रही सातवाहन कालीन दिवा मला बघायला मिळाला ..
ह्या दिव्यांमध्ये ..त्याकाळी बिब्बे , काजू , करंज ह्यांचे बीया पासून काढलेले तेल वापरण्यात येत असे..
तसेच , तिळ , शेंगदाणे , करडी , सुर्यफूल ह्याच्या तेलाचा वापर होत असेल काय ? याचा शोध घेणे गरजेचे आहे ..
प्राण्यांच्या चरबीचा वापर मात्र हमखास होत होता ..तुपाचा देखील वापर ते लोक करीत असत ..
सुमेरियन – असेरियन , इजिप्तिशयन दिव्यांचा काळ हा अति प्राचीन म्हणजे 5500 वर्षापुर्वीचा आहे ..
तर जुन्नरचा महाराष्ट्रातील दिवा हा इ.स.पु. दुसऱ्या ते इ.स.नंतर दुसऱ्या आशा कार्य काळातील आहे ..
निर्माण झालेली वस्तु व त्यांचे तंत्रामध्ये समानताच दिसून येते ..
सातवाहनांचा व्यापारी संबंध त्या काळात सर्व जगाशी होता ..हे ह्यावरून सिध्द होते ..
लाकडाच्या नांगराला लोखंडी फाळ , जाते , पाटे यांचा वापर सातवाहनांनीच सुरू केला होता ..महाराष्ट्र त्या काळातही प्रगतीच्या बाबातील प्रथम क्रमांकावरच होते .ह्याचे सर्व कर्तृत्व सातवाहन घराण्यालाच जाते ..
त्यांची राजवट इ.स.पु.200 ते इस.नंतर 220 अशा 420 वर्षाची होती ..
महेन्द्र शेगांवकर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *