राष्ट्रवादी युवक काॕंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 10 Second

 

कार्यकर्ता म्हणून सदैव काम करणार

सुरज माडूरवारांची प्रसिद्धीपत्रात माहिती

गोंडपिपरी

पडत्या काळात तालुक्यात पक्षाची बाजू सावरली.सातत्याने नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या कायम पेलल्या.पक्षाशी खंभिर कार्यकर्ते जोडत संघटन वाढविले.जनसामान्याचे प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रसंगी आंदोलने उभारली.अश्यातच खरी गरज असतांना विधानसभेच्या नेत्यांनी “बंडाचा झेंडा” हातात धरला.आणि पक्षात उभी फुट पाडली.अश्यावेळी देखिल आम्ही न डगमगता कायम राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.मात्र जिल्हास्थानावरुन तालुक्यावर वाढता हस्तक्षेप गटबाजीला खतपाणी घालणारा ठरला आहे.यामुळे मी राष्ट्रवादी युवक काॕंग्रेसच्या गोंडपिपरी तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असुन यासमोरही पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची ग्वाही सुरज माडूरवारांनी दिली.आपल्या राजीनाम्याची प्रत पक्षाच्या वरिष्ठांना पाठविल्यानंतर दिलेल्या प्रसिद्धीपत्रातून त्यांनी ही माहीती सांगितली.

गोंडपिपरी तालुक्यात कोठल्याही चळवळी,मोर्चे,आंदोलन असो त्यात युवा नेतृत्व सुरज माडूरवारांचा सहभाग नाही,असे क्वचीतच असते.तालुक्यातील राजकारण्यांत सुरज माडूरवारांचे नाव ठरलेल असते.असे असतांना काही दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात राष्ट्रवादी काॕंग्रेसमध्ये खलबते सुरु आहेत.राष्ट्रवादीच्या मनोज धानोरकरांनी तालुकाध्यक्ष पदासाठी असमर्थता दर्शविल्यानंतर सद्यस्थितीत हे पद नाममात्र ठरले आहे.अश्यावेळी मात्र पक्षाने गोंडपिपरीसाठी नवे तालुकाध्यक्ष नेमन्यासाठी हालचाली वाढविल्या.यावेळी पक्षाने गोंडपिपरीत बैठक बोलविली.जिल्हास्थानावरुन पदाधिकारी आले,मात्र पक्षाने राष्ट्रवादी युवक काॕंग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेल्या सुरज माडूरवारांना डावलत चक्क बैठक बोलवली.आणि आटोपली देखिल.जिल्हास्थानावरुण तालुक्यावर हस्तक्षेप वाढत आहे.हि भुमिका गटबाजीला खतपाणी घालणारी ठरली आहे.यामुळे तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्यात एकवाक्यता उरली नाही.यामुळे मी राष्ट्रवादी युवक काॕंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजिनामा देत असल्याचे मत सुरज माडूरवारांनी मांडले.मात्र मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून सदैव कार्यरत राहणार असल्याचे मत देखिल सुरज माडूरवारांनी प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

राजिनामा तुर्तास नामंजूर ; भटारकर

गेल्या बर्याच वर्षापासून माडूरवारांचे काम पक्षाला उभारी देणारे आहे.त्यांच्या कामाने आम्ही समाधानी आहोत.त्यामुळे त्यांचा राजिनामा तुर्तास नामंजूर करण्यात येत आहे.

– नितिन भटारकर,जिल्हाध्यक्ष,रायुकाॕ,चंद्रपूर.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *