पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या ;जि.प.सभापती उरकुडेंची मागणी

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 3 Second

गोंडपिपरी

गोसीखुर्द प्रकल्पाचे दरवाजे उघडले.याचा फटका सावली,ब्रम्हपुरीसह गोंडपिपरी तालुक्याला देखिल बसला.या कृत्रिम महापुराची नाहक झळ गोंडपिपरी तालुक्याला सोसावी लागली.तब्बल १८ गावातील शेती पाण्याखाली आली.बरिच घरेही कोसळली.शेतकऱ्यांवर मोठ संकट आढावले.कोरोनामुळे आधिच त्रस्त, हवालदिल ह्या बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहिर करावी,अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांनी केली आहे.नुकताच त्यांनी गोंडपिपरी तालुक्यातील पुरामुळे बाधित गावांना भेटी देत परिसराची पाहणी केली.

गोंडपिपरी तालुक्यातील २३४३ हेक्टर शेती पाण्याखाली आली.यात १५१० शेतकरी बाधित झाले.अनेक शेतांमधील विजेचे पंप,पाईप,मोटारी वाहून गेल्या.शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके वाया गेले.आठवडाभर पिके पाण्याखाली राहिली.यामुळे पेरणीसाठी खत,बियाणे खरेदीसह मशागतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची कशी ? या चिंतेत बळीराजा सापडला आहे.असे असतांना जिल्हा परिषदेचे सभापती सुनिल उरकुडे,गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार,जि.प.सदस्य राहुल संतोषवार,आदिंसह भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुरग्रस्त परिसरांची पाहणी केली.यावेळी त्यांनी नंदवर्धन,शिवणी,पानोरा,सालेझरी,राळापेठ,तारसा (बु),कुलथा आणि विठ्ठलवाडा आदी गावांना भेटी देत शेतपिकांची पाहणी केली.उद्योगविरहीत गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीसह शेतीपुरक व्यवसायावर आहे.यामुळे आधिच कोरोना विषानुमुळे त्रस्त शेतकऱ्यांनी कर्जवाडी,हातउसने करत धान,कापूस,सोयाबीन,तूर आदी पिकांची लागवड केली.मात्र या कृत्रिम महापुरामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली.अन बळीराजा संकटात सापडला आहे.अश्यावेळी बाधित शेतकऱ्यांना ताडीने मदत जाहिर करण्याची मागणी सभापती उरकुडे यांनी केली आहे.यावेळी कृषी अधिकारी सपकाळ,नाना येल्लेवार,भानेश येग्गेवार,ग्रामविकास अधिकारी आशिक सुखदेवे आदिंची उपस्थिती होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *