जातक कथा

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:4 Minute, 25 Second

इसाप निती , पंचतंत्र कथांच्याही चारशे वर्ष अगोदर ” ” जातक कथांचे ” अस्तित्व आहे ..
जातक कथा देखील ह्या संस्कार कथाच आहेत ..
जातक कथामधून समाजाला मौल्यवान संदेश दिला जातो ,..
ही “कुरूंगमृग जातक ” कथा आहे,,ही भरहूत स्तुप सातना जिल्हा मध्यप्रदेश येथे होती ,.हल्ली हे शिल्प कोलकत्ता वस्तुसंग्राहालयात आहे ..

एका तळ्या काठावर एका उंच झाडावर शतपत्र पक्षी ( सारंग पक्षी) राहत असतो ..तळ्यातील जलचर त्याचे खाद्य असते ..पण त्याची मैत्री तळ्यातील एका कासवाशी असते ,.त्याच तळ्याच्या काठांवरील कोवळे मऊ हिरवे गवत खायला रोज एक कुरूंगमृग ( नर हरीण ) येत असते ..अगदी थोड्याच दिवसात सारंग पक्षी , कासव आणी हरीण असे तिघेही जिवलाग मित्र बनतात ..
एके दिवशी एक शिकारी तळ्याकाठावर फासाचे जाळे ठोकून ठेवतो ..आणी घरी निघून जातो ..
संध्याकाळी कुरूंग मृग पाणी पिण्यासाठी येतो ..तेंव्हा तो त्या फासात अडकून पडतो ..तो जोराजोरात ओरडतो ..धडपडतो ..
हे पाहून झाडावरील सारंगपक्षी जागा होतो ,,तो तळ्यातील कासवाला बोलावतो ..
कासव ते जाळे तोडण्याचे कार्य करू लागतो ..पण त्याचे दात प्रभावी नसतात एक एक दोर तोडायला त्याला खुप विलंब लागतो ..तो पर्यंत पहाट होण्याची चिन्हे दिसू लागतात ..ते पाहून सारंग पक्षी शिकाऱ्याच्या रस्त्यावर पुढे जाऊन बसतो ,.शिकारी घराबाहेर निघता बरोबर त्याचे कपाळावर चोंच मारून प्रहार करतो ..शिकाऱ्याला तो अपशकुन वाटतो ..तो घरात जाऊन दोन तास आराम करतो ..इकडे कासव सर्व दोर तोडतांना पार थकुन जातो ,.त्याचे दात रक्तबंबाळ होतात ..एक दोर तोडायचा बाकी असते ..शिकारी सकाळी सूर्य निघाल्यावर तळ्याकडे निघतो ..बघतो तर सारंग पक्षी त्याचे आसपास घिरट्या घालत असतोच ..त्याला न जुमानता तळ्याजवळ येतो ,.त्याला पाहाताच शेवटचा दोर कासव तोडायचा प्रयत्न करतो ,.आणी मृग देखील जोर लावून दोर तोडतो ..बघता बघता मृग पळून जंगलात दिसेनासा होतो ..
हारीण पळून गेल्याचे पाहून शिकारी नाराज होतो ..पण तिथेच रात्रभर मेहनत करणारे कासव गलितगात्र पडलेले पाहून त्याला आनंद होतो ,.आपल्या पिशवीत त्या कासवाला टाकून शिकारी परत निघतो ..
हे जेंव्हा कुरूंगमृगाला समजते ..तेंव्हा तो फार दुःखी होतो..
तो आणी सारंग पक्षी दुसरी युक्ती करतात ,.
कुरूंगमृग आत्ता दुडक्या लंगड्या चालीने चालत शिकाऱ्याला दिसते ..त्याला वाटते आत्ता हे हरीण जखमी व थकलेले आहे ,.आपणास हे सहज हाती लागेल ..म्हणून त्याने कासव असलेली पिशवी एका झाडावर अडकवतो आणी तो मृगाचे मागे लागतो ..
इकडे सारंग पक्षाने ती पिशवी उघडून कासवाला मुक्त केले ..हे पाहून कुरूंगमृग वायुवेगाने पसार होतो ..ते पाहून शिकारी पिशवीकडे येतो ,,बघतो ते काय ?
पिशवी रिकामी झालेली दिसते ..
जिवापाड मैत्री जपली पाहिजे ,.एकमेकांना मदत केल्याने सर्वाचे प्राण वाचतात ..” एकमेका साह्य करू अवघे धरु सुपंथ ”
हाच संदेश ह्या जातककथेत दिलेला आहे ..

महेन्द्र शेगांवकर

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *