पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत द्या — माजी आ. वामनराव चटप

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 6 Second

 

तालुक्यातील पूरग्रस्त शेतीची केली पाहणी

गोंडपिपरी

पाण्याचा प्रचंड साठा वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील अगदी सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीला पूर आल्याने गोंडपिपरी तालुक्यातिल १८ गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर धान व कपाशीच्या पिकासह काही गावे पाण्याखाली आली. शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पिकांचे अतोनात नुकसान बघता नुसकान ग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपयाचे तात्काळ मदत जाहीर करण्यात यावे अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव चटप यांनी दि.6 सप्टेंबर रोजी गोंडपिपरी येथिल सा.बा. विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी, पानोरा, सालेझरी, राळापेठ, तारसा(खुर्द), कुलथा, विठ्ठलवाडा, येनबोथला या पुरग्रस्त गावाना प्रत्यक्ष भेट दिली. व तालुक्यातिल पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विस्थापित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
पूरग्रस्त शेतीची पाहणी केली असता उभ्या पिकांचे अतोनात नुसकान झाले आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्‍टर 25 हजार रुपये याप्रमाणे त्वरित नुसकान भरपाई देण्यात यावी, सदरील शेतकऱ्यांचे पिक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, शेतीवरील मोटार पंपाचे वीज बिल पूर्णता माफ करावे, परिसरातील शेतकऱ्यांना जाहीर केलेले धानाचे बोनस त्वरित वाटप करण्यात यावे, जेणेकरून पीडित शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचे उत्पन्न घेण्यास हातभार होऊन शेतकरी पुन्हा नव्याने कामाला लागू शकतो. त्यामुळे हया सर्व मागण्या शासनाने तातडीने मार्गी लावावे. असेही मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.
यावेळी तुकेश वानोडे तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना,डॉ. संजय लोहे, सुधीर फुलझेले, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *