आश्वासनानुसार रोजगार द्या / युवक काँग्रेस आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:3 Minute, 28 Second

 

गोंडपिपरी

केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर वर्षाकाठी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज घडीला याची कुठलीही पूर्तता सरकारकडून केल्या जात नसल्याने देशावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने आश्वासनानुसार “रोजगार द्या” या आशयाची मागणी करणारे निवेदन (दि.8 सप्टें) गोंडपिपरी येथील युवक काँग्रेस आघाडीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान केंद्रातील भाजपा सरकारने वर्षाकाठी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे घोषणा केली. याच आश्वासनाला देशातील तरुण पिढी बळी पडली आणि भाजपा सरकार सत्तेवर आले. आल्याआल्याच सरकारने नोटबंदी जाहीर केली. नोटबंदीच्या काळात अनेक सूक्ष्म,लघु, व मध्यम स्वरूपातील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणारे उद्योग ठप्प पडले. कृषी, लघुउद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. आणि यामुळेच अनेक रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय बंद पडले. परिणामत: देशात बेरोजगारीचे मोठे संकट कोसळले.
आज घडीला देशावर कोरोनाचे संकट आले. आणि अशा बिकट परिस्थितीत युवक तरुण वर्गाला रोजगाराअभावी उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीस लाख करोड चे पॅकेज जाहीर केले मात्र याचा फायदा इथल्या कष्टकरी व बेरोजगार तरुणांना मिळाला नाही. रोजगार अभावी अनेक युवा तरुणांनी आत्महत्या सारखे पर्याय निवडले, तर अनेकांनी अवैद्य व्यवसायाच्या मार्गी लागले. त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार वर्षाकाठी दोन कोटी रोजगार निर्मिती करावी व बेरोजगार युवक तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावेत. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन गोंडपिंपरी येथील युवक काँग्रेस आघाडीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. यावेळी संतोषभाऊ बंडावार तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस गोंडपिपरी, तुकाराम झाडे तालुकाध्यक्ष काँग्रेस कमेटी गोंडपिपरी,नामदेव सांगडे,गौतम झाडे,जितेंद्र गोहणे,वनिता वाघाडे,गजानन पाल,अखिल गजेड्डीवार,सचिन फुलझेले,सचिन सिडाम, रत्नज्योत कांबळे आदीसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *