व्यापारी म्हणतात ” शासकिय कार्यालयही बंद ठेवा “

0 0
Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 57 Second

तरच करणार जनता कर्फुला सहकार्य

गोंडपिपरीः-

जिल्हा प्रशासनाकडून येणा-या दिवसात जिल्हाभरात जनता कर्फु लावण्याचे संकेत आहेत.कोरोनाला रोकण्यासाठी असे प्रयोग आवश्यक आहेत.पण फक्त बाजारपेठ बंद ठेउन काही होणार नाही.त्यासाठी संपुर्ण प्रशासकिय कार्यालय,बॅकाही बंद ठेवाव्या.असे केल्यास महिनाभर बंद ठेवा आम्ही प्रशासनाला पुर्ण सहकार्य करू.पण केवळ बाजारपेठ बंद ठेवणार असाल तर आमचा नाईलाज असेल असा सज्जड दम आज गोंडपिपरी तालुका व्यापारी संघटनेेने आयोजीत पत्रपरिषदेत दिला.
कोरोनाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम केल्या जात आहेत.याचाच एक भाग म्हणून लाॅकडाउन व जनता कर्फु ही लावल्या जात आहे.वारवंार असे होत असल्याने व्यापारावर बराच परिणाम झाला आहे.गोंडपिपरी तालुक्यात अधिकारी,कर्मचा-यांनी कोरोना आणला.त्यांचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिक व व्यापा-यांना बसत आहे.गोंडपिपरी तालुका व्यापारी संघटना हि प्रशासनाला नेहमी सहकार्य करित आली आहे.मात्र प्रशासकिय कार्यालयातील व बॅकांतील गर्दी कमी केल्याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव थांबणार नाही.येत्या काही दिवसात जिल्हयात जनता कर्फु लावल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.मात्र हा जनता कर्फु लावतांना प्रशासकिय कार्यालय,बॅका पुर्णत बंद ठेवाव्या तेव्हाच आम्ही बाजारपेठ बंद ठेउ व प्रशासनाला सहकार्य करू.केवळ बाजारपेठ बंद ठेवायची अन बाकी कार्यालय उघडी ठेवायची अस जमनार नसल्याच व्यापारी संघटनेन आज पत्रपरिषदेतून सांगितल.
गोंडपिपरी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर सुरकर,सचिव अजय माडूरवार,उपाध्यक्ष रितेश वेगीनवार,निळकंठ गौरकार,सुहास माडूरवार,अमीत वेगीनवार,प्रदीप बोनगिरवार,विष्णू हिवरकर,विकी ताडूरवार,विवेक गौरकार या व्यापारी संघटनेच्या पदाधिका-यांनी आज पत्रपरिषद घेउन आपली बाजू मांडली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Advertisements

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *